नाशिक, 9 मे (हिं.स.)।
- भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यानंतर सैनिकांचे मनोबल वाढावे यासाठी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने नाशिक मध्ये श्री मारुतीची आरती करण्यात आली.
मागील दोन दिवसापासून भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालेले आहे या युद्धाचा पार्श्वभूमीवरती भारतीय सैनिकांचे मनोबल वाढावे यासाठी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी पूजा अर्चा सुरू झालेले आहेत. शुक्रवारी सायंकाळी नासिक शहरातील शालिमार चौकामध्ये असलेल्या मारुतीची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आरती करण्यात आली यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डीजे सूर्यवंशी, महानगर प्रमुख विलास शिंदे ज्येष्ठ नेते सुनील बागुल , वसंत गीते, दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, सुधाकर बडगुजर, संजय चव्हाण, देवानंद बिरारी, राजेंद्र वाकसरे, सुनील गोडसे, प्रथमेश गीते, ऋतुराज पांडे, यांच्यासह शेकडो शिवसैनिक व नागरिक सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI