सोलापूर : दहापट स्टॅम्प ड्यूटीचा फटका; ‘शक्तिपीठ’मध्ये बाधित नसतानाही शेतकऱ्यांचे नुकसान
सोलापूर, 9 मे (हिं.स.)। शक्तिपीठ महामार्ग बार्शी तालुक्यात गौडगाव, रुई, हत्तीज, चिंचखोपण येथून खुंटेवाडीमार्गे शेळगावकडे जात असतानाही रुईतर्फे रातंजन असा उल्लेख यादीत असल्याने वर्षभरापासून रातंजनच्या शेतकऱ्यांना महसूल विभागाने वेठीस धरले आहे. यामुळे
सोलापूर : दहापट स्टॅम्प ड्यूटीचा फटका; ‘शक्तिपीठ’मध्ये बाधित नसतानाही शेतकऱ्यांचे नुकसान


सोलापूर, 9 मे (हिं.स.)।

शक्तिपीठ महामार्ग बार्शी तालुक्यात गौडगाव, रुई, हत्तीज, चिंचखोपण येथून खुंटेवाडीमार्गे शेळगावकडे जात असतानाही रुईतर्फे रातंजन असा उल्लेख यादीत असल्याने वर्षभरापासून रातंजनच्या शेतकऱ्यांना महसूल विभागाने वेठीस धरले आहे. यामुळे खरेदी विक्री रखडली असून दहापट स्टॅम्प ड्यूटी भरून जमीन खरेदी करण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.

नागपूर- गोवा हा शक्तिपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातून जातो. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातून गौडगाव, रुई, हत्तीज, चिंचखोपण येथून तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथे त्यानंतर पुन्हा बार्शी तालुक्यातील शेळगाववरून उत्तर सोलापूर तालुक्यात प्रवेश करतो. मात्र, रुई या गावचे नाव यादी रुईतर्फे रातंजन असे लिहिलेले असल्याने रातंजन येथील शेतकऱ्यांचे गटनंबरही बाधित शेतकऱ्यांच्या यादीत आले. एकदा नाव यादीत आले की त्या शेतकऱ्यांना जमीन खरेदी-विक्रीवेळी दहापट स्टँप ड्युटी भरावी लागते. परिणामी वर्षभरापासून येथील शेतकऱ्यांच्या खरेदी विक्रीसाठी दहापट स्टॅम्प ड्यूटी भरावी लागली आहे. महसूल प्रशासनाच्या चुकीमुळे एक वर्षापेक्षा अधिक दिवस या शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande