शिवसेना प्रत्येक तालुक्यात डायलिसिस सेंटर उभारणार - योगेश कदम
सोलापूर, 9 मे (हिं.स.)। महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शिवसेना पुढाकार घेऊन डायलिसिस सेंटर व ब्लड बँक उभा करण्याचे नियोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करत असून, सर्वसामान्यांची रुग्णसेवा शिवसेनाच करू शकते, असे प्रतिप
शिवसेना प्रत्येक तालुक्यात डायलिसिस सेंटर उभारणार - योगेश कदम


सोलापूर, 9 मे (हिं.स.)। महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शिवसेना पुढाकार घेऊन डायलिसिस सेंटर व ब्लड बँक उभा करण्याचे नियोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करत असून, सर्वसामान्यांची रुग्णसेवा शिवसेनाच करू शकते, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.

करमाळा येथे डॉ. श्रीकांत शिंदे डायलिसिस सेंटरला त्यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत मंगेश चिवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले.

मंत्री योगेश कदम पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे एक संवेदनशील नेतृत्व असून, महाराष्ट्रातील कोणताही रुग्ण उपचाराशिवाय राहिला नाही पाहिजे यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेनेचे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रात अहोरात्र काम करत आहेत. सर्वसामान्यांना आरोग्य उपचारासंदर्भात काही गरज लागली तर त्याला पहिल्यांदा शिवसेना आठवते, हेच खरं शिवसेनेचे यश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande