महेंद्रसिंग धोनी आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये
नवी दिल्ली, 10 जून (हिं.स.)। टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने केलेल्या या सन्मानामुळे धोनीच्या सोनेरी क्रिकेट कारकीर्दीला आणखी झळाळी मिळाली आहे. आयसीसी
महेंद्रसिंग धोनी


नवी दिल्ली, 10 जून (हिं.स.)। टीम

इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये

समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने केलेल्या या

सन्मानामुळे धोनीच्या सोनेरी क्रिकेट कारकीर्दीला आणखी झळाळी मिळाली आहे. आयसीसी

अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून महेंद्रसिंग धोनीचा या वर्षी सन्मानित

होणाऱ्या सात क्रिकेटपटूंमध्ये समावेश करण्यात केला आहे.

यावर्षी आयसीसीने एकूण सात क्रिकेटपटूंना आयसीसी हॉल ऑफ

फेममध्ये स्थान दिलं आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन आणि दक्षिण

आफ्रिकेचा हाशिम आमला या आणि अशा आणखी काही महान क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

‘’जगभरातील विविध

पिढ्यांमधील क्रिकेटपटूंच्या योगदानाची दखल घेत आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये नाव मिळणे

हा एक सन्मान आहे.’’‘’अशा सर्वकालीन महान खेळाडूंसोबत माझे नाव

पाहणे ही एक अद्भुत अनुभूती’’असल्याचे

महेंद्रसिंग धोनीने प्रांजळपणे

कबुल केले.

महेंद्रसिंग धोनीने आपल्या सोनेरी क्रिकेट

कारकीर्दीमध्ये २००७ मध्ये टी विश्वचषक, २०११ एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ आयसीसी

चॅम्पियन्स ट्रॉफीचं अजिंक्यपद पटकावण्याची किमया साधली आहे. आयसीसी हॉल ऑफ

फेममध्येमध्ये आतापर्यंत भारताच्या सुनील गावस्कर, बिशन सिंग बेदी, कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विनू मंकड, डायना एडुलजी, वीरेंद्र सेहवाग आणि नीतू डेव्हिड या

क्रिकेटपटूंना स्थान पटकावता आलं आहे. आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारा

धोनी भारताचा अकरावा क्रिकेटपटू ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande