लंडन, 11 जून (हिं.स.) भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी
सामन्यांच्या मालिकेला २० जूनपासून सुरुवात होतेय. पहिल्या कसोटीपूर्वी
इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जोश टंग दुखापतग्रस्त झाल्याने
इंग्लिश संघाच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.
भारत ‘अ’ आणि इंग्लंड
लायन्स यांच्यातील सामन्यावेळी जोश टंगला दुखापत झाल्याचं निदर्शनास आलं होतं.
त्याची दुखापत कितपत गंभीर आहे याची माहिती अजून मिळालेली नाही. इंग्लंड
संघव्यवस्थापन कुठलाही धोका पत्करायला सध्या तयार नाही. कारण आधीच या संघाला
दुखापतींनी ग्रासलं आहे. मार्क वुड दुखापतीमुळे संघाबाहेर आहे, तर जोफ्रा आर्चरही
सुरुवातीच्या कसोटी सामन्यांना मुकणार आहे.
जोश टंगला
दुखापत झाल्याने इंग्लंडने १९ वर्षाय एडी जॅकला पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी संघात
स्थान दिलं आहे. जॅक इंग्लंड लायन्सकडून भारताविरुद्धचे दोन्ही अनौपचारिक कसोटी
सामने खेळला होता. या दोन्ही सामन्यात त्याला केवळ दोनच बळी घेता आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra