नवी दिल्ली, 11 जून (हिं.स.)
वेस्ट इंडिजच्या निकोलस पुररने आंतरराष्ट्रीय
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लगेचच त्याला एमआय न्यूयॉर्कचे कर्णधारपद
भूषवण्याची जबाबदारी मिळाली आहे. अमेरिकेतील मेजर क्रिकेट लीगमध्ये आता तो एमआय न्यूयॉर्क
या संघाचं नेतृत्व करताना क्रिकेटप्रेमींना पहायला मिळेल.
एमएलसी म्हणजेच अमेरिकेतल्या मेजर क्रिकेट लीग या
स्पर्धेत २०२५ हंगामासाठी पुरन एमआय न्यूयॉर्क संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार
आहे. २०२३ च्या हंगमात एमएलसी या स्पर्धेमध्ये खेळताना निकोलस पुरन ३८८ धावांसह
सर्वाधिक धावा करणार फलंदाज ठरला होता. याच हंगमात त्याने नाबाद १३७ धावांची खेळी
त्याने खेळली होती. या स्फोटक खेळीच्या आठवणी आजही क्रिकेट चाहत्यांच्या मनात
ताज्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यनंतर लगेचच
दुसऱ्या दिवशी त्याला एमआय न्यूयॉर्क संघाचं कर्णधारपद मिळालं आहे. २०२३ प्रमाणेँ
२०२५ च्या हंगामात निकोलस आपल्या फलंदाजीने पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींची मनं
जिंकण्यास सज्ज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra