रियान परागकडे नामिबियाच्या दौऱ्यासाठी नेतृत्व
नवी दिल्ली, 11 जून (हिं.स.)। इंडियन प्रिमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व केल्यानंतर आता रियान पराग नामिबियाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या आसामच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. या दौऱ्यात ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आ
रियान पराग


नवी दिल्ली, 11 जून (हिं.स.)।

इंडियन प्रिमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सचं

नेतृत्व केल्यानंतर आता रियान पराग नामिबियाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या आसामच्या संघाचं

नेतृत्व करणार आहे. या दौऱ्यात ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

२१ जून पासून या ५ एकदिवसीय सामन्यांच्या

मालिकेला सुरुवात होणार आहे. आसामच्या संघामध्ये रियान परागबरोबरच आकाश सेनगुप्ता,

परवेझ मुशरर्फ आणि डेनिश दास या अनुभवी क्रिकेटपटूंचा भरणा आहे. तर नामिबियाच्या

संघाचं कर्णधारपद गेरार्ड इरासमस भूषवणार आहे.

आयपीएलच्या २०२५ च्या हंगमात रियान परागला एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून यश मिळालं नाही.

१४ सामन्यात त्याला केवळ ३९३ धावाच करता आल्या होत्या. केवळ एकच अर्धशतक त्याला या

स्पर्धेत झळकावता आलं होतं. त्यामुळे या दौऱ्यात रियान परागचा आपल्या फलंदाजीने

संघाला विजय मिळून देण्यावर भर असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande