वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पुरन क्रिकेटमधून निवृत्त
नवी दिल्ली, 10 जून, (हिं.स.) वेस्ट इंडिजचा तडाखेंबद फलंदाज निकोलस पुरनने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या केवळ २९ व्या वर्षी त्याने क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतल्याने क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का
निकोलस पुरन


नवी दिल्ली, 10 जून, (हिं.स.) वेस्ट इंडिजचा तडाखेंबद फलंदाज निकोलस

पुरनने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या केवळ २९ व्या वर्षी त्याने

क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतल्याने क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का

बसला आहे. पुरनने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली क्रिकेटमधील निवृत्तीची घोषणा

केली.

निकोलस पुररने आपल्या क्रिकेट

कारकीर्दीत एकूण ६१ टी-२० आणि १०६ एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाचं प्रतिनिधीत्व

केलं आहे. या दोन्ही प्रकारांमध्ये त्याने ४ हजाराहून अधिक धावा केल्या

होत्या. २०२५ च्या आयपीएल हंगामात तो लखनऊ जायंट्सकडून खेळला होता. त्याने १४

सामन्यात २०० च्या स्ट्राईक रेटने ५२४ धावांची बरसात केली होती.

पूरनने आपल्या सोशल मीडियावर

लिहिले आहे की, ‘’खूप विचार आणि चिंतनानंतर, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

घेण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळाने मला खूप आनंद दिला आहे. मरून रंगाची जर्सी

घालणे, राष्ट्रगीतासाठी उभे राहणे आणि मैदानावर पाऊल ठेवताना प्रत्येक वेळी

आपले सर्वोत्तम देणे, ते क्षण शब्दात मांडणे माझ्यासाठी कठीण आहे.’’

निकोलस पुरनने क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्याने वेस्ट इंडिज

क्रिकेटमध्ये न भरुन निघणरी पोकळी निर्माण झाली आहे. पुरन आता केवळ क्रिकेट जगतातील

इतर टी-२० लीगमध्ये खेळताना त्याच्या चाहत्यांना दिसेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande