डब्ल्यूटीसी फायनल :  पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व
लॉर्ड्स , 12 जून (हिं.स.)। वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच डब्ल्यूटीसी फायनलच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याच्या पहिल्याच दिवशी वेगवान गोलंदाजांनी आपला दबदबा राखला. पहिल्या दिवशी दोन्ही संघाचे मिळनून तब्बल १४
डबल्यूटीए


लॉर्ड्स , 12 जून (हिं.स.)।

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच डब्ल्यूटीसी

फायनलच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याच्या पहिल्याच दिवशी वेगवान

गोलंदाजांनी आपला दबदबा राखला. पहिल्या दिवशी दोन्ही संघाचे मिळनून तब्बल १४

फलंदाज गोलंदाजांनी बाद केले.

लॉर्ड्सच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक

जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता कर्णधारा हा निर्णय आफ्रिकन

गोलंदाजांनी सार्थ ठरवला. द. आफ्रिकेच्या गोलंदाजांटच्या भेदक माऱ्यामुळे

ऑस्ट्रेलियाचा संघ हिल्या डावात २१२ धावाच करु शकला. कगिसो रबाडाने कांगारुंचे ५

गडी बाद करत त्यांच्या डावाला खिंडार पाडलं. अनुभवी स्टिव्ह स्मिथ आणि ब्यू

वेबस्टरच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाला २०० धावांचा टप्पा पार करता

आला.

ऑस्ट्रेलियन संघाला २५० धावांच्या आतच पहिल्या

डावात रोखल्यानंतर दक्षिण आफ्रिकन फलंदाजही सपशेल अपयशी ठरले. पहिल्या दिवसाचा खेळ

संपला तेव्हा आफ्रिकन संघाची ४ बाद ४३ धावा अशी बिकट अवस्था झाली होती.दक्षिण

आफ्रिकन संघ अजूनही ऑस्ट्रेलियाच्या १६९ धावांनी पिछाडीवर आहे. आता ही पिछाडी भरुन

काढण्यात आफ्रिकन संघ यशस्वी होतो. की, पहिल्या दिवसप्रमाणे कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज आफ्रिकेला रोखण्यात यश मिळवणार का ? याकडेच

तमाम क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande