अकोला आणि बुलढाणा दोन जिल्ह्यातील मोटरसायल चोरास अटक
अकोला, 19 जून (हिं.स.)।अकोल्याच्या जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दुचाकी चोरीला गेली होती..अशी तक्रार फिर्यादी मोरगाव साजन येथील 52 वर्षीय संजय ज्ञानदेव टेकाडे यांनी दिलेल्या फिर्याद वरून पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे गुन्हा नोंद केला होता..
अटक लोगो


अकोला, 19 जून (हिं.स.)।अकोल्याच्या जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दुचाकी चोरीला गेली होती..अशी तक्रार फिर्यादी मोरगाव साजन येथील 52 वर्षीय संजय ज्ञानदेव टेकाडे यांनी दिलेल्या फिर्याद वरून पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे गुन्हा नोंद केला होता.. दरम्यान या गुन्हयाचे तपासात हिंगणा म्हैसपुर येथील 36 वर्षीय योगेश रामेश्वर पेसोडे याला अटक केली.. त्याचे कडुन गुन्हयात चोरी गेलेली एक हीरो होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल आणि बुलढाण्याच्या नांदुरा पोलीस ठाण्यातील चोरी गेलेली मोटरसायकल अशा दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.. या प्रकरणाचा उलगडा जुने शहर चे ठाणेदार नितीन लेव्हरकर आणि यांच्या पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे..

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande