धुळे, 2 जून (हिं.स.) महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या सूचनेनुसार धुळे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील बैल, गोऱ्हा, गाय, वासरु, म्हैस, हेले व वगार-पारडी आदी सर्व जनावरे यांचा खरेदी-विक्रीचे व्यवहार 3 ते 8 जूनपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे, अशी माहिती धुळे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील यांनी दिली आहे.
शेतकरी, गुरे व्यापारी यांनी धुळे कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये 3 ते 8 जून या कालावधीत बैल, गोऱ्हा, गाय, वासरु, म्हैस, हेले व वगार-पारडी आदी सर्व जनावरे विक्रीसाठी आणु नये. व प्रशासनास सहकार्य करावे, असेही धुळे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती पाटील यांनी कळविले आहे.
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर