रायगड - मित्रच ठरला खुनी; अजिवलीतील सोनूचा पवना घाटात खून
रायगड, 20 जून, (हिं.स.)। खालापूर अजिवली येथील बेपत्ता झालेल्या युवकाच्या प्रकरणाला भीषण वळण लागले आहे. त्या युवकाचा खून झाल्याच्या प्रकाराने संपूर्ण खळबळ उडाली आहे. अली शहाजमाल शेख उर्फ सोनू वय 35 बेपत्ता होण्याच्या वृत्तानंतर आता त्याचा खून झाल्याच
मित्रच ठरला खुनी अजिवलीतील सोनूचा पवना घाटात खून


रायगड, 20 जून, (हिं.स.)। खालापूर अजिवली येथील बेपत्ता झालेल्या युवकाच्या प्रकरणाला भीषण वळण लागले आहे. त्या युवकाचा खून झाल्याच्या प्रकाराने संपूर्ण खळबळ उडाली आहे. अली शहाजमाल शेख उर्फ सोनू वय 35 बेपत्ता होण्याच्या वृत्तानंतर आता त्याचा खून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. दिनांक 17 जून 2025 रोजी सोनूचा मृतदेह लोणावळा हद्दीत पवना धरणाच्या चढावर सिंदगाव परिसरात आढळून आला होता. सुरुवातीला बेपत्ता म्हणून दाखल असलेले हे प्रकरण आता खुणाच्या गुन्ह्यात रूपांतरित झाले आहे.

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात 168/25 नुसार बी. ए. एन. एस. कलम 103 (1) 238 (३) 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केतन सांगळे यांच्या माहितीनुसार, मयत सोनू व 4 तरुण एकत्र फिरण्यासाठी मुठा मुळशी येथे गेले होते.

मात्र दुसऱ्या दिवशी सोनु आणि आरोपी आशिष चव्हाण यांच्यात वाद झाल्यानंतर सर्व आरोपींनी संगमत करून सोनूचा गळा आवळून खून केला.

आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात फेकून दिला. या प्रकरणात आरोपी आशिष चव्हाण राहणार डोणवत, शुभम यादव राहणार आपटी, अमर मोरे राहणार आपटी झाडांनी व एक विधी संघर्षग्रस्त बालक वय 17 यांचा समावेश आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रशांत आवळे हे करत असून अधिक चौकशीसाठी आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दोन दिवसापूर्वी बेपत्ता असल्याची माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर आज त्या प्रकरणाची परिणती हत्तेत झाल्याची पुष्टी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अजूनही काही धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता तपासात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant


 rajesh pande