सिन्नर : आई समोरच बिबट्याने 4 वर्षीय बालिकेला ओढून नेले
सिन्नर, 20 जून (हिं.स.) : तालुक्यातील गोंदे शिवारामध्ये शेतामध्ये लपलेल्या बिबट्याने आईसमोरच चार वर्षाच्या बालिकेला ओढून घेऊन जात ठार केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे यामध्ये बालिकेचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवारी सायंकाळी शेतामध्ये काम करून घरी परत जात असताना लपून बसलेल्या बिबट्याने आईच्या डोळ्यासमोर तिच्या लेकरास ओढून घेऊन जात हल्ला केला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आई व त्यांच्यासोबत असलेल्या मजुरांनी आरडाओरड करत ज्वारीच्या पिकात धाव घेतली.त्यांच्या आरडाओरडमुळे बिबट्याने जान्हवीला सोडून तेथून पळ काढला. मात्र, बिबट्याने जान्हवीच्या मानेला पकडल्याने मानेला खोलवर जखमा झाल्या होत्या.ही माहिती मजुरांनी तात्काळ शेतमालक शरद तांबे व प्रकाश तांबे यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत जान्हवीला दुचाकीवरून उपचारासाठी सिन्नर प्राथमिक रुग्णालयात नेले पण सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी जान्हवीला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती वनविभाग व वावी पोलिसांना समजतात त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

सर्व साधारण वर्षभरापूर्वी देखील याच परिसरामध्ये आठ वर्षीय बालकाला बिबट्याने ओढून नेले होते आणि त्या हल्ल्यामध्ये त्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली होती पुन्हा वर्षभरानंतर याच परिसरात ही घटना घडली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI

 rajesh pande