अकोला : थकित करापोटी उत्तर झोन येथील मालमत्तांवर जप्तीची कारवाई
अकोला, 13 मार्च (हिं.स.)। मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त विजय पारतवार आणि सहा.आयुक्त विठ्ठल देवकते यांच्या मार्गदर्शनातअकोला महानगरपालिका क्षेत्रातील उत्तर झोन अंतर्गत न्यू तापडिया
Photo


अकोला, 13 मार्च (हिं.स.)। मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त विजय पारतवार आणि सहा.आयुक्त विठ्ठल देवकते यांच्या मार्गदर्शनातअकोला महानगरपालिका क्षेत्रातील उत्तर झोन अंतर्गत न्यू तापडिया नगर येथील वार्ड क्र. C-11, मधील मालमत्ता क्रमांक 445 धा. मनोहर कृपलानी व दत्तू पवार यांच्याकडे आज पर्यंत एकूण रक्कम रु. 1,68,275/- मालमत्ता कर थकित असल्याने, तसेच मालमत्ता क्र. 616 धा. विजय भास्करराव देशमुख यांच्याकडे एकूण रक्कम रू. 68,378/- मालमत्ता कर थकित असल्याने, तसेच मालमत्ता क्र. 666 धा. निळकंठ रमेश बोंद्रे यांच्याकडे एकूण रक्कम रू. 61,951/- मालमत्ता कर थकित असल्याने तसेच वार्ड क्रमांक C-1 मधील मालमत्ता क्र. 1084 यांच्याकडे एकूण रक्कम 149203/- एवढा मालमत्ता कर थकीत असल्याने सदर मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक आयुक्त विठ्ठल देवकते, सहाय्यक अधीक्षक पंकज जोगळेकर, वरिष्ठ लिपिक हेमंत शेळवणे, लिपिक योगेश पागृत, संतोष गाडेकर, लिपिक मोहन घाटोळ आदींची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande