अकोट - कॅटरिंगच्या गोडाऊनला भीषण आग, लाखोंचे नुकसान
अकोला, 13 मार्च (हिं.स.) :अकोला जिल्ह्यातील अकोटशहरातील लोहारी मार्गावरील एका कॅटरिंग व्यावसायिकाच्या गोडाऊनला भीषण आग लागली. गोडाऊनमध्ये साठवलेल्या गॅस सिलिंडरच्या सलग स्फोटामुळे आग रौद्र रूप धारण झाली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही; मात
Photo


अकोला, 13 मार्च (हिं.स.) :अकोला जिल्ह्यातील अकोटशहरातील लोहारी मार्गावरील एका कॅटरिंग व्यावसायिकाच्या गोडाऊनला भीषण आग लागली. गोडाऊनमध्ये साठवलेल्या गॅस सिलिंडरच्या सलग स्फोटामुळे आग रौद्र रूप धारण झाली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही; मात्र, व्यावसायिकाचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कॉलनी परिसरातील विजय इंगळे यांच्या कॅटरिंग व्यवसायाचा हा गोडाऊन होता. येथे व्यवसायासाठी लागणारे साहित्य, अन्नधान्य आणि मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर साठवून ठेवण्यात आले होते. अचानक आग लागल्याने सिलिंडर स्फोट होऊन टीनपत्रे हवेत उडाली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. महसूल विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले आणि घटनेचा रीतसर पंचनामा केला. प्राथमिक तपासात ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अधिकार्‍यांच्या मते, गोडाऊनमधील संपूर्ण फर्निचर, अन्नधान्य आणि कॅटरिंगचे महागडे साहित्य जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande