अंबाबाई मंदिरातील गर्भगृहांचे जतन-संवर्धन; १४ ते १७ मार्च दरम्यान दर्शन व्यवस्थेत बदल
कोल्हापूर, 13 मार्च (हिं.स.) : करवीर येथील श्री महालक्ष्मी / अंबाबाई मंदिरात 14 ते 17 मार्च या कालावधीत पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली मंदिरातील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी / श्री अंबाबाई व श्री महासरस्वती या तिन्ही गर्भगृहांचे अंतर्गत व बाहेरील
श्री अंबाबाई मंदिर परिसर


कोल्हापूर, 13 मार्च (हिं.स.) : करवीर येथील श्री महालक्ष्मी / अंबाबाई मंदिरात 14 ते 17 मार्च या कालावधीत पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली मंदिरातील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी / श्री अंबाबाई व श्री महासरस्वती या तिन्ही गर्भगृहांचे अंतर्गत व बाहेरील भागांचे जतन व संवर्धनाचे काम करण्यात येणार आहे.

या कामाच्या अनुषंगाने वरील कालावधीत या गर्भगृहांमध्ये सर्वसाधारण दर्शनाची व्यवस्था उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे भक्तांसाठी मंदिर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. याअंतर्गत, श्रींच्या प्राणप्रतिष्ठापीत मंगल श्रीकलश व उत्सवमूर्तीचे दर्शन मुक्ती मंडप (पितळी उंबरा) येथून करता येईल. तसेच, भक्तांना पितळी उंबरठा व श्री गणपती मंडप येथूनही दर्शन घेता येईल. आगामी

१७ मार्च रोजी, आवश्यक सर्व आगमोक्त व वेदोक्त धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर दुपारी १२.३० वाजताच्या आरतीपासून श्री जगदंबेचे दर्शन पूर्ववत सुरू होईल.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी भक्तांना मंदिर प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande