मिटकरींची हाकेंवर पुन्हा जहरी टीका
अकोला, 7 जून (हिं.स.)।गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. आज अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा लक्ष्मण हाकेंवर निशाणा साधला आहे. मिटकरींनी हाकेंवर टीक
मिटकरींची हाकेंवर पुन्हा जहरी टीका


अकोला, 7 जून (हिं.स.)।गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. आज अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा लक्ष्मण हाकेंवर निशाणा साधला आहे. मिटकरींनी हाकेंवर टीका करताना 'विंचू चावला तर त्याचा मुका घ्यायचा नसतो, त्याची नांगी ठेचायची असते अशा तिखट शब्दात अमोल मिटकरींनी लक्ष्मण हाकेंवर निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण सध्या अमोल मिटकरी विरुद्ध लक्ष्मण हाके यांच्यातील वाकयुद्धामुळे तापले आहे. अमोल मिटकरी पोस्टमध्ये म्हणतात, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर विकृत लोकांकडून आरोप केला जात आहे. झाकणझुल्याच्या माहितीसाठी. सोबत अमोल मिटकरींनी राज्य सरकारतर्फे विविध महामंडळांना दिलेला निधी याची आकडेवारीच पोस्ट केली आहे. तर अकोल्यात आज माध्यमातून संवाद साधताना अमोल मिटकरी म्हणाले की, यावर (महामंडळांचा निधी) कोणाला शंका असेल तर त्यांनी मंत्रालयात जाऊन संपर्क करावा. लक्ष्मण हाके यांचं नाव न घेता पुढे बोलताना म्हणाले, ज्याला अक्कल नसेल त्याला आमच्या भाषेत उत्तर द्यायलाही आम्ही तयार आहोत. जर तुम्हाला विंचू चावला तर त्याचा मुका घ्यायचा नसतो. त्याची नांगी ठेचायची असते. आज एकादशी असल्याने मला वाद-विवाद करायचा नाही असेही मिटकरींनी म्हटलं आहे.

तर बहीण भाऊ लवकरच एकत्र

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. 'पांडूरंगाची इच्छा असली तर बहिण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात. 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा'. मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचे मिटकरींनी सुतोवाच केलं आहे. पांडूरंगाची इच्छा असली तर आषाढीपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं मिटकरींनी भाकीत केलं आहे. अकोल्यात येऊन अमोल मिटकरी ची पोलखोल करणार असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं.. यावर प्रत्युत्तर देताना अकोलाकरांची पाहूनचार करण्याची पद्धत आहे.. ती अकोल्यात आल्यानंतर लक्ष्मण हाकेची सुद्धा केली जाणार असल्याच आमदार मिटकरी म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande