मुंबई, 1 जुलै (हिं.स.)।
विधानभवनातील विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
एकाच जिद्द, शक्तिपीठ रद्द, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आल्या.
महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुंबई येथील विधान भवन परिसरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. राज्याला अन्नधान्यात स्वयंभू बनणाऱ्या या लोकनेत्याच्या स्मृतींना यावेळी उजाळा दिला.
याप्रसंगी महाविकास आघाडीचे आमदार उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने