भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
लंडन, 1 जुलै (हिं.स.) भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांमध्ये सध्या ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने इंग्लंडचा ९७ धावांनी पराभव केला. या
स्मृती मंधाना


लंडन, 1 जुलै (हिं.स.) भारत

आणि इंग्लंडच्या महिला संघांमध्ये सध्या ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जात

आहे. नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात

भारताने इंग्लंडचा ९७ धावांनी पराभव केला. या सामन्यात स्मृती मानधनाने तुफानी शतक

झळकावले होते. आता मालिकेतील दुसऱ्या टी-२० मध्ये यजमान इंग्लंड पुनरागमन करण्याचा

प्रयत्न करेल. तर भारतीय संघ सलग दुसरा सामना जिंकून आपली पकड

मजबूत करण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरणार आहे.

सराव

सामन्यादरम्यान डोक्याला दुखापत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून हरमनप्रीतला

पहिल्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. या सामन्यात तिचं पुनरागमन होण्याची

शक्यता आहे. पहिल्या टी-२० सामन्यात भारताच्या फिरकी आक्रमणासमोर इंग्लंडची

फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. त्यांच्या फलंदाजांकडे भारतीय

फिरकी गोलंदाजांना व विशेषतः डावखुरी फिरकी गोलंदाज श्री चरणीने पहिल्याच टी-२०

आंतरराष्ट्रीय सामन्यात चार विकेट्स घेतल्या. गेल्या वर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय

क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या मानधनाने शतक झळकावत भारताचा विजय निश्चित केला

होता. आता तिच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा भारतीय संघाला असणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande