इंद्रायणी नदी सुधारसाठी निविदा
पुणे, 14 जुलै (हिं.स.)। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या इंद्रायणी नदी सुधार योजना मार्गी लागणार आहे. या प्रकल्पासाठी सल्लागार नेमून निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी हाती घेतली आहे. चार महिन्यांत ही सर्व प्रक्रिया प
इंद्रायणी नदी सुधारसाठी निविदा


पुणे, 14 जुलै (हिं.स.)।

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या इंद्रायणी नदी सुधार योजना मार्गी लागणार आहे. या प्रकल्पासाठी सल्लागार नेमून निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी हाती घेतली आहे. चार महिन्यांत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली.

नदी सुधार योजनेतंर्गत पीएमआरडीएने हद्दीतील सुमारे ८७ किलोमीटर लांबीचा इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प हाती घेतला आहे. प्राधिकरणाकडून या प्रकल्पांचा सर्वंकष विकास आराखडा यापूर्वीच तयार करून राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. केंद्र सरकारकडून त्यास तत्त्वतः: मान्यता मिळाली आहे.

प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील विलंब टाळण्यासाठी पीएमआरडीएने सल्लागार नियुक्ती करण्याची प्रक्रिया पूर्ण करून निवड केली आहे. निवड केलेल्या सल्लागार कंपनीमार्फत आराखड्याची तपासणी करून निविदा राबविण्यात येणार आहे. त्यासाठी चार महिन्यांचा कालावधी सल्लागार कंपनीला देण्यात आला आहे.

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande