राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडले जाणार
नवी दिल्ली, 14 जुलै (हिं.स.) केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीया यांनी सांगितले की, बहुप्रतिक्षित राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात संसदेत मांडले जाईल. मी काही दिवसांत अधिक तपशील देईन, अस
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक


नवी दिल्ली, 14 जुलै (हिं.स.)

केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीया यांनी सांगितले की, बहुप्रतिक्षित

राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात

संसदेत मांडले जाईल. मी काही दिवसांत अधिक तपशील देईन, असे मांडवीय

म्हणाले. या विधेयकात देशातील क्रीडा प्रशासकांसाठी अधिक जबाबदारी सुनिश्चित

करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये एका नियामक मंडळाची तरतूद असेल ज्याला

राष्ट्रीय क्रीडा महासंघांना सुशासनाशी संबंधित तरतुदींचे पालन करण्याच्या आधारावर

मान्यता देण्याचा आणि निधी देण्याचा निर्णय घेण्याचा

अधिकार असेल.

एप्रिलमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे

भारताशी असलेले संबंध आणखी बिघडले असले तरी, भारतातील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये

पाकिस्तानचा सहभाग थांबवला जाणार नसल्याची सरकारची भूमिका मांडविया यांनी पुन्हा

एकदा मांडली. पुढील महिन्यात बिहारमध्ये होणारी पुरुषांची आशिया कप हॉकी स्पर्धा, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये

होणारा एफआयएच ज्युनियर वर्ल्ड कप आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणारा ज्युनियर

नेमबाजी वर्ल्ड कप या तीन प्रमुख स्पर्धांमध्ये पाकिस्तानचा सहभाग अपेक्षित आहे.

आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला कोणत्याही

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळण्यास कोणतीही अडचण नाही, मग ते क्रिकेट, हॉकी अथवा इतर

कोणताही खेळ असो. पण जेव्हा द्विपक्षीय स्पर्धांचा विचार केला जातो तेव्हा सरकारची

भूमिका सर्वांना माहिती आहे, असे मांडविया म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande