पीएमपी तिकिटावर पुरुष-महिला नोंद
पुणे, 14 जुलै (हिं.स.)। पीएमपी बसने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. मात्र, या प्रवाशांमध्ये किती पुरुष, महिला आणि लहान मुले प्रवास करतात याची माहिती मिळण्यासाठी पीएमपीकडून तिकिटावर नोंदी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार दैनंदिन प्रवाशी संख्या दह
पीएमपी तिकिटावर पुरुष-महिला नोंद


पुणे, 14 जुलै (हिं.स.)।

पीएमपी बसने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. मात्र, या प्रवाशांमध्ये किती पुरुष, महिला आणि लहान मुले प्रवास करतात याची माहिती मिळण्यासाठी पीएमपीकडून तिकिटावर नोंदी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार दैनंदिन प्रवाशी संख्या दहा ते अकरा लाख असून, त्यामध्ये सरासरी दैनंदिन पुरुष प्रवासी संख्या साडेपाच ते सहा लाख आणि महिला प्रवासी संख्या साडेचार ते पावणेपाच लाख इतकी असल्याचे दिसून येते.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात ३८१ मार्गावर सार्वजनिक बस सेवा दिली जाते. पुणेकरांची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीच्या साधारण १ हजार ६५० ते १ हजार ७०० बस मार्गावर धावतात. त्यामधून दररोज दहा ते अकरा लाख प्रवाशी प्रवास करतात.

पीएमपीकडून प्रवाशांच्या व प्रशासनाच्या सोईसाठी २०१०-२०११ च्या सुमारास ई-तिकीट मशिन सुरू केले. त्यामुळे एकूण तिकीट विक्रीच्या नोंदी, तिकीट विक्रीतून मिळणारी रक्कम अशी विविध माहिती तत्काळ मिळणे शक्य झाले.

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande