गोवा, हरियाणात नवे राज्यपाल, लडाखमध्येही उपराज्यपालांची नियुक्ती
नवी दिल्ली, 14 जुलै (हिं.स.) -राष्ट्रपती भवन कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुसापती अशोक गजपती राजू यांची गोव्याचे, प्रो. अशीम कुमार घोष यांची हरियाणाच्या राज्यपाल पदी, तसेच कविंदर गुप्ता यांची लडाखच्या उपराज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल, उपराज्यपाल


नवी दिल्ली, 14 जुलै (हिं.स.) -राष्ट्रपती भवन कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुसापती अशोक गजपती राजू यांची गोव्याचे, प्रो. अशीम कुमार घोष यांची हरियाणाच्या राज्यपाल पदी, तसेच कविंदर गुप्ता यांची लडाखच्या उपराज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्या तत्काल प्रभावाने लागू करण्यात येत आहेत. दरम्यान लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल ब्रिगेडियर डॉ. बी.डी. मिश्रा (निवृत्त) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे.

कोण आहेत नवे राज्यपाल आणि उपराज्यपाल

पुसापती अशोक गजपती राजू यांच्या आधी पीएस श्रीधरन पिल्लई गोव्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळत होते. पुसापति अशोक गजपति राजू माजी केंद्रीय नागरी उड्डान मंत्री आहेत. ते आंध्र प्रदेश विधानसभेत १९७८ ते २००४ आणि २००९ ते २०१४ या कालावधीत सात वेळा निवडून आले होते. त्यांनी वाणिज्य कर, उत्पादन शुल्क, कायदेविषयक व्यवहार, वित्त, नियोजन आणि महसूल यांसारख्या विभागात १३ वर्षे मंत्री म्हणून काम केले. पुसापती हे विजयनगरमचे शेवटचे महाराजा गजपती राजू यांचे धाकटे पुत्र आहेत. त्यांचे कुटुंब परोपकारी कार्यासह विजयनगरममधील सिंहचलम मंदिर आणि शैक्षणिक संस्थांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना सार्वजनिक आरोग्य, जलसंधारण आणि वीज संरक्षणात विशेष आवड आहे. त्यांनी आंध्र प्रदेशात गृहनिर्माण, पिण्याचे पाणी आणि आरोग्य योजनांना प्रोत्साहन दिले आहे.

याआधी १८ जुलै २०२१ पासून बंडारू दत्तात्रेय हरियाणाच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळत होते. आता त्यांच्या जागी असीम कुमार घोष यांची हरियाणाचे नवे राज्यपाल असणार आहेत. घोष यांनी उच्च शैक्षणिक पदांवर काम केले असून उच्च शिक्षणातील प्रशासकीय अनुभवासाठी ते ओळखले जातात.

जम्मूतील ज्येष्ठ भाजप नेते कविंदर गुप्ता हे लडाखमधील नवी दिल्लीच्या प्रशासकीय उपस्थितीचा नवा चेहरा बनले आहेत. गुप्ता यांनी यापूर्वी जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष भूषवले आहे. याशिवाय पीडीपी-भाजप युतीच्या काळात त्यांना उपमुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande