पाकिस्तानने चीनमधून प्रक्षेपित केला रिमोट सॅटेलाईट
इस्लामाबाद, 31 जुलै (हिं.स.)।पाकिस्तानने चीनच्या मदतीने PRSS-01 नावाचा एक रिमोट सेन्सिंग उपग्रह प्रक्षेपित केला आहे. या उपग्रहाचं प्रक्षेपण चीनमधील शिचांग सॅटेलाइट लॉन्चिंग सेंटर येथून करण्यात आलं.पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी (३१ जुल
Pakistan launches satellite


इस्लामाबाद, 31 जुलै (हिं.स.)।पाकिस्तानने चीनच्या मदतीने PRSS-01 नावाचा एक रिमोट सेन्सिंग उपग्रह प्रक्षेपित केला आहे. या उपग्रहाचं प्रक्षेपण चीनमधील शिचांग सॅटेलाइट लॉन्चिंग सेंटर येथून करण्यात आलं.पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी (३१ जुलै) एक्सवर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली.

पाकिस्तान मंत्रालयाने सांगितले की , “पाकिस्तानने अंतराळ क्षेत्रात एक मोठी उपलब्धी मिळवली आहे. चीनमधील शिचांग सॅटेलाइट लॉन्चिंग सेंटरमधून रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आहे. हा उपग्रह पाकिस्तानला २४ तास उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा प्रदान करेल.” या उपग्रहामुळे शहरी नियोजन, मूलभूत सुविधा विकास, आपत्ती व्यवस्थापन, कृषी निरीक्षण, अन्न सुरक्षा, पर्यावरण संवर्धन आणि जलसंपदा व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांमध्ये निरीक्षण व नियोजन सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा एक भाग पाकव्याप्त काश्मीरमधून जातो, तो प्रत्यक्षात भारताचा एक भाग आहे. हा उपग्रह पीओकेवरही लक्ष ठेवेल आणि ही भारतासाठीही एक धोक्याची घंटा आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानच्या राष्ट्रीय अंतराळ संस्था SUPARCO ने चीनच्या CETC आणि MICROSAT या कंपन्यांसोबत मिळून हा उपग्रह विकसित व प्रक्षेपित केला. या यशानंतर पाकिस्तानने अंतराळ क्षेत्रात आपली स्थिती अधिक बळकट केली आहे. हा पाकिस्तानचा दुसरा रिमोट-कंट्रोल्ड उपग्रह आहे. यापूर्वी PRSS-1 लाँच करण्यात आला होता. तो २०१८ मध्ये लाँच करण्यात आला होता. या नवीन उपग्रहामुळे पाकिस्तानचे एकूण ५ उपग्रह अंतराळ कक्षेत सक्रिय झाले आहेत. पाकिस्तानचे म्हणणे आहे की, यामुळे आम्हाला अवकाश-आधारित देखरेख आणि आपत्ती व्यवस्थापनात मदत होईल. पाकिस्तान अंतराळ मोहिमांमध्येही पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्यातील संबंध आधीपासूनच मजबूत आहेत. चीनने पाकिस्तानमध्ये अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे दोन्ही देशांमधील रणनीतिक भागीदारी अधिक मजबूत झाली आहे. असंही म्हटलं जातं की भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यानही चीनने पाकिस्तानला मोठी मदत केली होती. सध्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) प्रकल्प मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. सीपीईसी हा एक आर्थिक आणि पायाभूत सुविधा विकास प्रकल्प आहे, जो दोन्ही देशांतील रणनीतिक भागीदारीचा भाग आहे. हा प्रकल्प चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI)’ चा एक महत्त्वाचा घटक आहे, ज्याचा उद्देश प्रादेशिक कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि आर्थिक सहकार्याला चालना देणे हा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande