इराणकडून तेल खरेदी केल्याने अमेरिकेची भारताच्या ६ कंपन्यांवर बंदी
वॉशिंग्टन, 31 जुलै (हिं.स.)। अमेरिकेने भारताला आणखी एक मोठा झटका दिला आहे. अमेरिकेने इराणमधून तेल आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या व्यापारात सहभागी असल्याबद्दल भारताच्या सहा पेट्रोलियम कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने
Trump


वॉशिंग्टन, 31 जुलै (हिं.स.)। अमेरिकेने भारताला आणखी एक मोठा झटका दिला आहे. अमेरिकेने इराणमधून तेल आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या व्यापारात सहभागी असल्याबद्दल भारताच्या सहा पेट्रोलियम कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी(दि.३०) इराणसोबत व्यापार करणाऱ्या २० कंपन्यांवर निर्बंध जाहीर केले, ज्यात भारताच्या सहा कंपन्यांचा समावेश आहे. अमेरिकेचा आरोप आहे की या कंपन्यांनी इराणच्या निर्बंधांना टाळून कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यामध्ये अलकेमिकल सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, ग्लोबल इंडस्ट्रियल केमिकल्स लिमिटेड, जुपिटर डाई केम प्रायव्हेट लिमिटेड, रामनिकलाल एस. गोसालिया अँड कंपनी, पर्सिस्टेंट पेट्रोकेम प्रायव्हेट लिमिटेड आणि कंचन पॉलिमर्स यांचा समावेश आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, हे निर्बंध इराणवर जास्तीत जास्त दबाव आणण्याच्या अमेरिकेच्या धोरणाचा एक भाग आहेत. अमेरिकेचा असा दावा आहे की इराण आपल्या तेल आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न मध्य पूर्वेत अस्थिरता पसरवण्यासाठी आणि दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्यासाठी वापरतो.

अमेरिकेने म्हटले आहे की निर्बंधांचा उद्देश शिक्षा करणे नाही तर वर्तनात बदल घडवून आणणे आहे. जर निर्बंधित कंपन्या इच्छित असतील तर त्या निर्बंध उठवण्यासाठी अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाकडे अर्ज करू शकतात.

दरम्यान अमेरिकेने फक्त भारतीय कंपन्यांवरच नव्हे, तर तुर्किए, यूएई, चीन आणि इंडोनेशिया या देशांच्या कंपन्यांवरही निर्बंध लादले आहेत. याही कंपन्यांनी इराणसोबत व्यापार केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे, आणि त्यामुळे या कंपन्यांनाही बंदीचा सामना करावा लागतो आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande