जळगाव - लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर छापेमारी
जळगाव, 4 जुलै (हिं.स.) चाळीसगाव शहरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा चाळीसगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बनावट ग्राहक पाठवून चाळीसगाव पोलिसांनी सिनेस्टाईलरीत्या छापेमारी केली. याप्रकरणी व्यवस्थापकासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

चाळीसगाव शहरातील भडगाव रोडवरील विनायक प्लाझा हॉटेल व रेसिडेन्सी या लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापेमारी केली. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन महिला वेश्या व्यवसाय करताना पकडल्या गेल्या असून लॉज व्यवस्थापक प्रसाद गवळी, मनोज गवळीसह एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर

 rajesh pande