अकोल्यात धावत्या ऑटोत अल्पवयीन मुलीसोबत विनयभंग
आरोपी जाफर खान सुबेदार खान याला अटक अकोला, 5 जुलै (हिं.स.)।अकोल्यात एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका ऑटोचालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीसोबत नराधम ऑटो चालकाने लगट करण्याचा प्रयत्न केला असता ऑटोचालकाने तिच्या हाताला आण
P


आरोपी जाफर खान सुबेदार खान याला अटक

अकोला, 5 जुलै (हिं.स.)।अकोल्यात एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका ऑटोचालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीसोबत नराधम ऑटो चालकाने लगट करण्याचा प्रयत्न केला असता ऑटोचालकाने तिच्या हाताला आणि दंडाला चावा घेतला. कशीबशी या मुलीने ऑटो चालकाच्या तावडीतून सुटका केली. अकोल्यातील या प्रकारामुळे पालकांममध्ये धास्ती निर्माण झालीय. दरम्यान ऑटो चालकाच्या विरोधात अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाफर खान सुभेदार खान असं आरोपी ऑटो चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एक सोळा वर्षीय मुलगी नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी अकोला शहरात रूम भाड्याने करून राहत आहे. काल तिच्या गावावरून ती अकोल्यात परत आली. शहरातील बस स्थानकापासून रूमकडे ऑटो रिक्षाने जात असताना या ऑटो रिक्षा चालकाने तिचा विनयभंग केला. या ऑटो चालकाने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्नही केला. नराधम ऑटो चालकाच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न करीत असतानाच ऑटो चालकाने तिच्या हाताला आणि दंडाला चावा घेतला. दरम्यान कशी बशी सुटका करीत तिने पळ काढला. या संपूर्ण प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी ऑटो चालकाला अटक करून त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. जाफर खान सुभेदार खान असं अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचं नाव आहे. याबाबत अधिक तपास सिव्हिल लाईन ठाण्याचे पोलीस पुढील तपास करीत आहे.दरम्यान या घटनेनंतर पोलीस ठाण्यात प्रहार आणि बजरंग दलाचे दाखल झाले होते. विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकावर कठोर कारवाईची मागणी या दरम्यान करण्यात आली.

-------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande