अकोला, 5 जुलै (हिं.स.) : सध्या सगळीकडे सर्व कामे कंप्युटर द्वारे ऑनलाईन करणे अत्यावश्यक झाले आहे. कारण सध्या डिजिटल वर्क सर्वच ठिकाणी मागितले जात आहे. त्यामुळे कंप्युटर ऑपरेट करण्याचे प्रशिक्षण घेतलेले कुशल कारागीर हे विविध ठिकाणी सेवा केंद्र चालवतात. मात्र त्यांचे कुशल वर्क असतानाही त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. जेमतेम मेहताना घेऊन जनसेवा करणाऱ्या कंप्युटर ऑपरेटर कुशल कारागीरांची आज स्थानिक अशोक वाटीका सभागृहात बैठक संपन्न झाली आणि ऑनलाईन कंप्युटर ऑपरेटर असोसिएशनची स्थापना करून पहिली कार्यकारिणीही घोषित करण्यात आली असून अकोला जिल्हाध्यक्ष पदी शैलेश सूर्यवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली.
अल्प मोबदला घेऊन जनसामान्यांचे ऑनलाईन कामे करून देणते कुशल कारागीर एकसंघ नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्व कुशल कारागीर एकसंघ होण्यासाठी संघटना स्थापन करण्यासाठी अशोक वाटिका येथे बैठक संपन्न झाली त्यामध्ये ऑनलाईन कंप्युटर ऑपरेटर असोसिएशनची स्थापना करून कार्यकारिणीही घोषित करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्ष पदी शैलेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष पदी बाबुलाल डोंगरे, सचिव संदीप खंडारे, सहसचिव प्रवीण खंडारे, कोषध्यक्ष प्रेम वाकोडे, सह कोषध्यक्ष दिनेश डोंगरदिवे, संघटक सुनील वानखडे, सह संघटक नदीम शहा नईम शहा, सल्लगार सचिन पडोळे, महिला संघटक अनुराधा ढीसाळे, माया नेमाडे, कुंदन पवार, शें. एजाज, तर सदस्य पदी उज्वला तायडे, संदेश गोपनारायण, सिद्धार्थ पाटील, अक्षय सूर्यवंशी, केदार ठाकरे, अजय उपर्वट, अनिल येलकर, गोपाल पुंडकर, शुभम टोपरे, स्वप्नील उपर्वट, विजय राज ढोले, उध्वव ढीसाळे, शें. इर्शाद, जाकीर शहा, हसन गौ रवे, गौतम जामनिक, शकील खान, मुकिंदा अजणकर, ईश्वर गावंडे रामेश्वर नाटकर, एझान खान, किरण कावडे, अमोल पदमने, समीरशाह आदींचा समावेश करण्यात आला.
---------------------
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे