जय बाबाजी भक्त परिवाराची दिंडी रविवारी पंढरपुरात दाखल होणार !
नाशिक, 5 जुलै (हिं.स.) : निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या परंपरेनुसार उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी मौनागिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत वार्षिक पंढरपूर दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आल
जय बाबाजी भक्त परिवाराची दिंडी रविवारी पंढरपुरात दाखल होणार !


नाशिक, 5 जुलै (हिं.स.) : निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या परंपरेनुसार उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी मौनागिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत वार्षिक पंढरपूर दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ओझर व वेरुळ या दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दिंडीचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला.रविवारी ही दिंडी पंढरपुरात दाखल होणार असून फटाक्यांच्या आतिषबाजीत व पुष्पृष्टी करत दिंडीचे जंगी स्वागत केले जाणार आहे. जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने वेरुळ व ओझर या दोन्ही ठिकाणाहून दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान झाले आहे. जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज पिठाचे पिठाधीश्वर जगदगुरु शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत या दिंडी सोहळ्याचे आयोजित करण्यात आले आहे.जनशांती धाम ओझर येथून निघालेली दिंडी सिन्नर,संगमनेर, रहाता,अहिल्या नगर, करमाळा यांसह विविध तालुक्यातून मार्गक्रमण करून गावगावी सत्संग करत दिंडी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होत आहे.वेरुळ येथून निघालेली दिंडी रत्नपुर, गंगापूर,नेवासा,अहिल्यानगर,करमाळा,सोलापूर आदी विविध तालुक्यातून दिंडीचे नियोजन आहे.ठिकठिकाणी अन्नदान,सत्संग,नामस्मरण करत दिंडी पंढरपुरात पोहचणार आहे. या दोन्ही दिंड्या वेगवेगळ्या मार्गाने निघालेल्या असल्या तरी या दिंड्यांची रस्त्यात भेट होईल त्यावेळी देखील आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दिंडीत भक्त परिवाराच्या १०८ आश्रमातील सदगुरु चरण पादुका डोक्यावर घेऊन असंख्य भाविक दिंडीत सहभागी झालेले आहेत. दिंडीचे पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण होत असून जय बाबाजी भक्त परिवाराची ही दिंडी रविवारी पुण्यभूमी पंढरपूर येथे दाखल होणार आहे. पंढरपूर येथील जय बाबाजी भक्त परिवार जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या व दिंडीच्या स्वागतास सज्ज झाला आहे. दिंडी पंढरपुरात दाखल होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत व पुष्पृष्टी करत दिंडीचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande