अकोला, 13 ऑगस्ट (हिं.स.) : हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत चोहोटा बाजार येथे आज भर पावसात तिरंगा रॅली काढून भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभक्तीचा जागर करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आरंभ केलेल्या हर घर तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या महानायकांचे स्मरण करणे हाच या मागचा उद्देश आहे. त्यानिमित्ताने चोहोटा बाजार येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती पासून ते मुख्य मार्गांवरून ही तिरंगा रॅली काढण्यात आली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वरून राजाची जोरदार हजेरी आणि त्यात भाजपने काढलेल्या तिरंगा रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश गोतमारे, जिल्हा सरचिटणीस राजेश नागमते यांच्या प्रमुख उपस्थित ही रॅली काढण्यात आली. यावेळी मंडळ अध्यक्ष विठ्ठल वाकोडे, मधुकर पाटकर, माधवराव बकाल, गजानन नळे, विजयसिह सोळंके, संदीप उगले, दत्तू पाटील गावंडे, चेतन डोईफोडे, डॉ मनोहर चाकोते,पांडुरंग पाटकर, प्रमोद खंडारे, संदीप पाटील अरबट, निलेश वहिले,आशिष देशमुख, शंतनू तराळे, दत्ता डिक्कर, गजानन अवचार, विनोद साबळे, नारायण साबळे, रुपेश पेटे, किशोर वकते, दिलीप सुलताने ध्यानेश्वेर आढे, गोपाल झांबरे, न्यानेश्वेर झांबरे, मिलिंद गायकवाड, सुरेश बुंदे, हरिभाऊ आवारे, अमोल भगत, रामा पाथरे सह पदाधिकारी उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे