अकोला, 13 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबई नांदेड कडे जाणाऱ्या गाड्या जोडणारा इंटरलिंकग साठी 28 कोटी रुपये मंजूर झाले असून खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नाने अकोला नागपूर मुंबई च्या गाड्या नंबर चार पाच सहा या नंबरची डायरेक्ट जोडल्या जाणार आहेत दक्षिण मध्य रेल्वे आणि मध्य रेल्वे च्या गाड्यांना फार मोठा फायदा होणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे सल्लागार समिती सदस्य वसंत बाछुका यांनी दिली.
गेल्या पंधरा वर्षापासून माझी केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे या कामाला लागले होते या कामाला खासदार अनुप धोत्रे यांनी एका वर्षामध्ये मंजूर करून निविदा मंजूर करून कामाला सुरुवात करण्यात आली असून सप्टेंबर ते डिसेंबर च्या दरम्यान ही लिंकिंग जोडण्याचं काम होणार असल्याची ही त्यांनी सांगितले.
आता नंबर इंडियन बदलण्याचा काम होत होतं आता इंजन बदलण्याचं काम करावे लागणार नाही वेळेची बचत होऊन आणि प्लॅटफॉर्म नंबर एक दोन तीन चार पाच सहा यांचं लिंकिंग होऊन गाडी कुठेही थांबू शकते आणि नवीन गाड्या सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला असून अनेक गाड्यांमध्ये टाईम टेबल मध्ये गाड्या असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर एक आणि दोन वर मागे पुढे येत होत्या आता गाड्या येऊ शकतात त्या दिशेने ही महत्त्वपूर्ण काम झालं असून दक्षिण आणि मध्य रेल्वे यांच्या तील जबाबदारी यामुळे हे काम थांबले होते परंतु खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा करून 28 कोटी रुपये निधी मंजूर करून त्याच्या निविदा व कामाला सुरुवात करण्यात यश प्राप्त केले आहे. आता नांदेड दिल्ली मथुरा तसेच राजस्थान कडे जाणाऱ्या गाड्या इंजन मागेपुढे करण्याची गरज लागणार नाही खासदार अनुप धोत्रे सातत्याने रेल्वे प्रवाशांना सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असून रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांच्या सहकार्याने दिलेले शब्द पूर्तीकडे वाटचाल सुरू आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे