अकोला, 13 ऑगस्ट (हिं.स.)। पातूर घाटात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. आज पहाटे साडेचारच्या सुमारास (13 ऑगस्ट) एक अनियंत्रित ट्रक (क्रमांक TS-15-UA-1107) घाटात पलटल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये ट्रक चालक संजय विशंभर कदम आणि त्याचा साथीदार नामदेव दादाराव शिंदे (दोघेही रा. सोमठाणा, ता. नायगाव, जि. नांदेड) यांचा समावेश आहे. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार हनुमंत डोपेवार यांच्यासह पोलिस कर्मचारी वसीम शेख, आकाश जाधव, नामदेव शिंदे आणि सत्यजीत ठाकुर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे