पालघर - गुटखा तस्करीऐवजी दाखल केला चोरीचा गुन्हा
पालघर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। पालघर जिल्हातील मनोर परिसरात घडलेल्या एका अजब प्रकरणामुळे उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक सुरू असताना, त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. टेम्पोचालक त्रिजेश राजनाथ या
गुटखा चोरीचा गुन्हा दाखल


पालघर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। पालघर जिल्हातील मनोर परिसरात घडलेल्या एका अजब प्रकरणामुळे उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक सुरू असताना, त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

टेम्पोचालक त्रिजेश राजनाथ यादव गुजरातमधून पानमसाला व तंबाखूयुक्त गुटख्याची पाकिटे घेऊन पालघर जिल्ह्यात येत होता. वाडा-खडकोना परिसरात आल्यानंतर एका कारमधील सहा जणांनी टेम्पो अडवून त्यातील आठ लाखांचा मुद्देमाल लुटून नेला.

या प्रकरणी यादव यांच्या फिर्यादीवरून मनोर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. मात्र गुटखा हा प्रतिबंधित पदार्थ असून त्याची वाहतूक होत असताना तस्करीचा गुन्हा दाखल करण्याऐवजी केवळ चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, अन्य काही दबाव टाळण्यासाठीच पोलिसांनी मुद्दाम चोरीचा गुन्हा नोंदवल्याची चर्चा आहे. उपनिरीक्षक आर. पी. खोत या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande