रत्नागिरी, 18 ऑगस्ट, (हिं. स.) : कोकण रेल्वे प्रवासादरम्यान एका महिलेच्या बॅगमधून १ लाख ७० हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रत्नागिरी रेल्वे स्थानकावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीची घटना मंगळवारी (दि. १२ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८.१० वाजता घडली. सुदलै वादिक अनंता पैरुमाल कोनर (३४, रा. चेंबूर पूर्व, मुंबई) यांनी शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, त्या जामनगर एक्स्प्रेसमधून झोपून प्रवास करत होत्या. रेल्वे रत्नागिरी स्थानकावर आल्यानंतर त्यांना जाग आली असता खालच्या सीटखाली ठेवलेल्या बॅगमधील सोन्याची साखळी आणि पेन्डंट असा ऐवज चोरीस गेल्याचे लक्षात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी