जळगाव, 18 ऑगस्ट (हिं.स.) शहरातील रामेश्वर कॉलनीमधील २६ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना आज १८ ऑगस्ट रोजी उघडकीस आलीय. विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
विशाल मोची हा पंचमुखी हनुमान मंदीराजवळ वेल्डींग दुकानावर काम करतो. सोबत तो सोलर पॅनेलच्या बेस बसविण्याचे कामही करतो. रविवारी १७ ऑगस्ट रोजी रात्री काम उरकवून तो तुकाराम वाडी येथे राहत असलेल्या काकाच्या घरी रात्री थांबला होता. मात्र त्या परिसरातील वीजपुरवठा रात्री खंडित झाल्यामुळे विशाल याने महावितरण कार्यालयात कॉल केला. मात्र कॉल न घेतल्यामुळे विशाल हा त्यांचा काकाचा मुलगा आकाश जनार्दन मोची आणि मित्र राहूल भालेराव हे तक्रार करण्यासाठी दिक्षीत वाडी येथील महावितरण कार्यालयात केले होते. मात्र त्यावेळी विशालवर ६ ते ७ हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या त्याची केली. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन तो विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, या हत्येमागील कारण काय? हे अद्याप समजू शकले नसून मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर