पुणे, 18 ऑगस्ट (हिं.स.)।
दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप करून आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्याची धमकी देत पुण्यातील एका निवृत्त पोलीस अधिकारी, त्यांच्या पत्नीला तब्बल २४ लाखांना ऑनलाइन फसवले आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.वारजे येथील एस.व्ही.एस. सोसायटीत राहणारे अनंत महादेव मारणे (६९) यांनी फिर्यादीत म्हटले आहे आहे की, त्यांच्या पत्नी विमल मारणे यांच्या मोबाईलवर प्रदीप जयस्वाल नावाच्या व्यक्तीचा व्हॉट्सॲप कॉल आला.
त्याने आपण डाटा फायनान्स ऑफ इंडियाचा अधिकारी असल्याचे सांगितले. तुम्ही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या दहशतवादी संघटनेत सामील आहात, तसेच नाशिकला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल असल्याने अटक वॉरंट काढल्याचे सांगितले. पत्नीला हिंदी कमी कळत असल्याने त्यांनी फोन पतीकडे दिला. त्यानंतर दुसऱ्या कॉलवर स्वतःला अँटी करप्शनचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने नाशिक हेड ऑफिसशी जोडले असल्याचा दावा केला. एवढेच नव्हे तर मारणे यांच्या नावाने जारी केलेल्या नोटीसचा फोटोही दाखविला. यावेळी दोघांना तुमच्या बँक खात्याची चौकशी करावी लागेल.
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु