पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ल्या प्रकरणी 3 आरोपी अटकेत
रायगड, 16 ऑगस्ट, (हिं.स.)। दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी पत्रकार प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे सहकारी मयूर रणदिवे ह्यांच्यावर चार फाटा परिसरात काही अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला होता. लोखंडी रॉड, फायटर आणि सापळा पद्धतीने केलेल्या ह्या हल्ल्यात पत्रकार
पत्रकार प्रथमेश कुडेकर  3 आरोपी सापडले


रायगड, 16 ऑगस्ट, (हिं.स.)। दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी पत्रकार प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे सहकारी मयूर रणदिवे ह्यांच्यावर चार फाटा परिसरात काही अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला होता. लोखंडी रॉड, फायटर आणि सापळा पद्धतीने केलेल्या ह्या हल्ल्यात पत्रकार प्रथमेश कुडेकर ह्यांना गंभीर दुखापत झाली होती. सदरील घटनेची माहिती कळताच पत्रकार संघटनांनी धाव घेत कर्जत पोलीस ठाण्यात आरोपींवर कठोर कारवाई होण्याबाबत निवेदन दिले होते. अनेक राजकीय पक्षांनी सुद्धा पत्रकारावर झालेला हल्ला हा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे असं म्हणत आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली होती.

पोलिसांनी अधिक तपास करून काही तांत्रिक मुद्द्यांद्वारे घटनास्थळ परिसर, खोपोली, खालापूर, चौक, नेरळ आणि द्रुतगती मार्गासह, शेडुंग टोलनाका परिसरातील असंख्य सीसीटीव्ही तपासून ह्या गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले. ह्या गुन्ह्यात आत्तापर्यंत कर्जत आणि महाड ह्या परिसरातून एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित चार आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. आरोपींची नावे महेंद्र घारे , साहिल पवार , महेश मोरे अटक केलेल्या तीन आरोपीना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती आणि १५ ऑगस्ट रोजी आरोपींना जामीन मिळालेला आहे.

आरोपींनी गुन्ह्याकरिता वापरलेली एक मोटारसायकल आणि एक मारुती वॅगन आर कार जप्त करण्यात आलेली आहे. ह्या गुन्ह्याच्या तपासात कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले ह्यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, पोसई. सुशांत वरक, पोसई. किरण नवले, पोलीस हवालदार स्वप्नील येरुणकर, पोलीस हवालदार समीर भोईर, पोना. प्रवीण भालेराव, पोकॉ. विठ्ठल घावस, पोलीस हवालदार सागर शेवते ह्यांच्या पथकाने केली असून उर्वरित चार आरोपीना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सांगितले.

कर्जत तालुक्यातील या प्रकरणामुळे पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी मात्र लवकरच उर्वरित आरोपींना अटक होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant Salunke


 rajesh pande