पुणे, 16 ऑगस्ट, (हिं.स.)। पुणे सायबर पोलीस ठाण्यात प्रांजल खेवलकरच्या विरोधात एका महिलेच्या तक्रारीनंतर नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे खेवलकरच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. खेवलकर यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66E आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 77 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन करण्यात आलेली आहे. तिने आरोप केला आहे की, खेवलकर यांनी तिच्या संमतीशिवाय तिचे फोटो आणि व्हिडिओ चोरून काढले.या प्रकरणामुळे खेवलकरच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. पुणे सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
रुपाली चाकणकर यांनी खेवलकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करताना गंभीर आरोप केले होते. मानवी तस्करी प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी असं चाकणकरांनी म्हटलंय. रोहिणी खडसे यांच्याबद्दल सहानुभूती वाटते. पण जर त्यांना या सगळ्या प्रकाराची माहिती असेल आणि त्या समर्थन करत असतील तर गुन्ह्याचे समर्थन करणारा गुन्हेगारच असतो असंही चाकणकर पत्रकार परिषदेत म्हणाल्या होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु