कोला : भाजपतर्फे जुनी बस्ती येथील मानाचे रथाचे पूजन!
अकोला, 18 ऑगस्ट (हिं.स.) : मुर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे कडून शिवभक्तांचे दुपट्टा देऊन स्वागत केले. मुर्तीजापुर येथे शेवटच्या श्रावण सोमवारच्या दिवशी भव्य शिवभक्त कावळे यात्रा घेऊन येतात त्याचबरोबर सर्वप्रथम दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजपच्या
प


अकोला, 18 ऑगस्ट (हिं.स.) : मुर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे कडून शिवभक्तांचे दुपट्टा देऊन स्वागत केले.

मुर्तीजापुर येथे शेवटच्या श्रावण सोमवारच्या दिवशी भव्य शिवभक्त कावळे यात्रा घेऊन येतात त्याचबरोबर सर्वप्रथम दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजपच्या वतीने जुनी बस्ती येथील मानाचे रथाचे पूजन उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार हरीश पिंपळे यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमाला विधीपूर्वक पूजन करून व त्यांचे दुपट्टे नारळ देऊन स्वागत करण्यात आले त्याचबरोबर तहसीलदार शिल्पा बोबडे उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांनी सुद्धा शिवभक्तांचे स्वागत करून विधीपूर्वक पूजन केले

लाखुपरी येथून कावड घेऊन येणारे सर्व शिवभक्तांसाठी चहापाणी फराळ ची व्यवस्था आमदार हरीश पिंपळे यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नंदकिशोर राऊत प्रशांत ठाकरे शहराध्यक्ष हर्षल साबळे ,कमलाकर गावंडे, सचिन देशमुख ,कोमल तायडे ,प्रशांत हजारी, बबलू भिलोंडे, मोनाली ताई गावंडे, अमोल पिंपळे ,सुधीर दुबे, योगेश परसुले, राजकुमार नाचणे ,माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे ,कैलास महाजन, रामा हजारे ,राम खंडारे ,नितीन भटकर ,अंकुश अग्रवाल ,सुनील लचुवानी ,संतोष भांडे ,लखन अरोरा व इतर अनेक कार्यकर्ते मित्रपरिवार मोठ्या संख्येने शिवभक्तांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande