अकोला : राजेश्वर सेतूवरून पाणी वाहू लागले, वाहतूक बंद..
अकोला, 18 ऑगस्ट (हिं.स.) : अकोला शहरात गेल्या दीड तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोरणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे राजेश्वर सेतूच्या पुलावरून सुमारे एक फूट पाणी वाहू लागले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस
P


अकोला, 18 ऑगस्ट (हिं.स.) : अकोला शहरात गेल्या दीड तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोरणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे राजेश्वर सेतूच्या पुलावरून सुमारे एक फूट पाणी वाहू लागले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी बॅरिगेट लावले असून वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. या भागात वाहने आणि पादचाऱ्यांची हालचाल थांबवण्यात आली आहे. पावसाचा जोर लक्षात घेता प्रशासन सज्ज असून नागरिकांना नदीकाठी न जाण्याचे आणि सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande