आशिया कप हॉकी स्पर्धेत पाकिस्तानची जागा बांगलादेश घेण्याची शक्यता
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट (हिं.स.)पुढील काही दिवसांत पाकिस्तानने सहभाग निश्चित न केल्यास २९ ऑगस्टपासून बिहारमधील राजगीर येथे होणाऱ्या पुरुषांच्या आशिया कप हॉकी स्पर्धेत बांगलादेशची जागा घेण्याची शक्यता आहे. भारत सरकारने आधीच सांगितले होते की, ते आशिया कपस
आशिया कप हॉकी


नवी दिल्ली, 18 ऑगस्ट (हिं.स.)पुढील काही दिवसांत पाकिस्तानने सहभाग निश्चित न केल्यास २९ ऑगस्टपासून बिहारमधील राजगीर येथे होणाऱ्या पुरुषांच्या आशिया कप हॉकी स्पर्धेत बांगलादेशची जागा घेण्याची शक्यता आहे. भारत सरकारने आधीच सांगितले होते की, ते आशिया कपसाठी पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा देईल. पण पाकिस्तान हॉकी फेडरेशनने सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास करण्यास नकार दिला आहे. आठ संघांच्या स्पर्धेत पाकिस्तानची जागा भरण्यासाठी आयोजकांनी आधीच बांगलादेशशी संपर्क साधला आहे. पण हॉकी इंडियाने सांगितले की, नेमकी परिस्थिती पुढील दोन दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.

भारत सरकारने आधीच सांगितले आहे की, ते पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा देण्यास तयार आहे. पण जर ते भारतात येऊ इच्छित नसतील तर ती आमची समस्या नाही. जर पाकिस्तान आला नाही तर बांगलादेशला आधीच सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. पाकिस्तान किंवा बांगलादेश दोघांनीही काहीही कळवलेले नाही. पण बांगलादेश कदाचित या स्पर्धेत पाकिस्तानचा पर्याय असेल.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताशी झालेल्या लष्करी संघर्षानंतर आशिया कपमध्ये पाकिस्तानचा सहभाग आणि २०२६ च्या विश्वचषकासाठी पात्रता स्पर्धा अनिश्चित होता. पीएचएफने ही स्पर्धा भारतातून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा सल्ला दिला होता. यजमान भारताव्यतिरिक्त आशिया कपमध्ये सहभागी होणारे इतर संघ म्हणजे चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया, ओमान आणि चिनी तैपेई आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande