बुची बाबू स्पर्धेत सरफारज खानची झंझावती शतकी खेळी
चेन्नई, 18 ऑगस्ट (हिं.स.) : चेन्नई येथे सुरु असलेल्या बुची बाबू ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी टीएनसीए इलेव्हनविरुद्ध भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खानने मुंबईकडून शानदार शतक झळकावले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत सरफराजने केवळ ९२ चेंड
सरफराज खान


चेन्नई, 18 ऑगस्ट (हिं.स.) : चेन्नई येथे सुरु असलेल्या बुची बाबू ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी टीएनसीए इलेव्हनविरुद्ध भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खानने मुंबईकडून शानदार शतक झळकावले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत सरफराजने केवळ ९२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि आकाश पारकरसह सहाव्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. ११४ चेंडूत नाबाद १३८ धावांच खेळी करत तो रिटार्यड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. इंग्लंड दौऱ्यासाठी संघातून वगळण्यात आल्यानंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याच्या विचारात सरफराज आहे. ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेसाठी त्याला संघात निवडण्यात आले होते. पण पाच सामन्यांच्या मालिकेत तो एकही सामना खेळला नव्हता. गेल्या वर्षी न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यात सरफराज आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता. बंगळुरूमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने शानदार १५० धावांची खेळी केली होती. पण सरफराजला त्यानंतरच्या चार डावांमध्ये फक्त २१ धावा करता आल्या. ही कसोटी मालिका टीम इंडियाने ०-३ ने गमावली होती होता. आतापर्यंत ११ कसोटी डावांमध्ये, सरफराजने ३७.१० च्या सरासरीने ३७१ धावा केल्या आहेत. दरम्यान, इंग्लंडमध्ये नुकत्याच संपलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेत करुण नायर आणि साई सुदर्शन यांना आपली छाप सोडता आली नाही. त्यामुळे आता स्थानिक क्रिकेटमध्ये दर्जेदार खेळ करत पुन्हा एकदा संघात परतण्याची सुवर्णसंधी सर्फराजकडे आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील अलीकडील सामन्यात सरफराजने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारत अ संघाच्या इंग्लंड दौऱ्यात ९२ धावांची खेळी करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande