लंडन, 18 ऑगस्ट (हिं.स.)
इंग्लंडचा ऑफस्पिनर शोएब बशीरने लॉर्ड्स येथे भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजला बाद केल्याचा उल्लेख केला आहे. खरं तर बशीरने सिराजला बाद करून इंग्लंडला एक संस्मरणीय विजय मिळवून दिला होता. रवींद्र जडेजाच्या शानदार खेळीने भारत विजयाकडे वाटचाल करत होता. पण बशीरने सिराजला बाद केले आणि भारतीय संघाचा डावा आटोपला होता. ज्यामुळे भारताने सामना गमावला होता. बशीरने याचे श्रेय त्याचा माजी संघ सहकारी मोईन अलीला दिले आहे.
बशीर म्हणाला, मी एजबॅस्टन येथे पहिल्यांदाच मोईन अलीला भेटलो आणि आम्ही खूप बोललो. मोईनने मला कॅरम बॉल टाकण्यास प्रोत्साहित केले. मी त्याचा खूप आदर करतो आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचे त्याचे म्हणणे माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण होते. मी काही काळ कॅरम बॉलवर काम केले. मी सतत या चेंडूचा सराव करत होतो. मी सिराजला याच चेंडूवर बाद केले.
तो म्हणाला, 'दुसऱ्या डावात सिराजला बाद करण्याचा क्षण मला नेहमीच आठवेल कारण त्यावेळी भारत विजयाकडे वाटचाल करत होता. आम्ही संधी निर्माण करत होतो पण विकेट मिळवू शकलो नाही. कर्णधाराने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी त्याच्या विश्वासाप्रमाणे जगलो याचा मला आनंद आहे.' भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची ही मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. भारत लॉर्ड्स कसोटी जिंकू शकला नसला तरी, चौथी कसोटी अनिर्णित राहिली आणि ओव्हलमध्ये खेळलेला पाचवा सामना जिंकून मालिका बरोबरीत राखली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे