बाबर आझमला आशिया कपमधून वगळण्यावरून वाद; जावेद मियाँदादची निवड समितीवर टीका
इस्लामाबाद, 18 ऑगस्ट (हिं.स.) आशिया कप २०२५ साठी पाकिस्तानचा संघ जाहीर झाला आहे. पण या संघ निवडीमुळे पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण माजी कर्णधार बाबर आझम आणि यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यांना संघातून वगळण्यात आले. हे
बाबर आझम आणि जावेद मियाँदाद


इस्लामाबाद, 18 ऑगस्ट (हिं.स.)

आशिया कप २०२५ साठी पाकिस्तानचा संघ जाहीर झाला आहे. पण या संघ निवडीमुळे पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण माजी कर्णधार बाबर आझम आणि यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यांना संघातून वगळण्यात आले. हे तेच दोन फलंदाज आहेत जे पाकिस्तानसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत. तरीही निवड समितीने त्यांना संघातून वगळले आहे.

निवडकर्त्यांच्या या निर्णयावर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी निवडकर्त्यांवर टीका केली आहे. मियाँदाद म्हणाले की, निवडकर्त्यांनाच माहिती नाही. त्यांनी कधी क्रिकेट खेळले आहे का? तो कोणत्या पातळीवर क्रिकेट खेळला आहे? ते बाबर आझमला संघातून वगळत आहेत. त्याला काय माहिती आहे? बाबर आझम एक उत्तम क्रिकेटपटू आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येकाचे चढ-उतार असतात. ते रेडिओसारखे असते, तुम्हाला स्टेशन पकडावे लागते. जेव्हा तुम्ही मैदानावर जाता तेव्हा तुम्ही गोलंदाजाकडे पाहता आणि विचार करता - हो, मी हे करू शकतो.

सलमान अली आघकडेा आशिया कप २०२५ साठी पाकिस्तानच्या नेतृत्वाच धुरा सोपवण्यात आली आहे. फखर जमान, साहिबजादा फरहान आणि सैम अयुब सारख्या फलंदाजांना संघात समाविष्ट करण्यात आले आहे. मोहम्मद हरिस यष्टिरक्षकाची जबाबदारी स्वीकारतील. शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि हसन अली हे वेगवान गोलंदाज संघात आहेत.

पाकिस्तानची आशिया कप मोहीम १२ सप्टेंबर रोजी ओमानविरुद्ध सुरू होईल. यानंतर १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तान भारताशी हाय-व्होल्टेज सामन्यात भिडेल. पाकिस्तान ग्रुप ए मध्ये आहे, ज्यामध्ये भारत, ओमान आणि यूएईचा संघ देखील आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande