मराठवाड्यातील पूर परिस्थिती, सैन्य दलाची तुकडी नांदेडला पाठवली
छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगर नांदेड लातूर परभणी हिंगोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घेतली असून तातडीने प्रशासनाला अनेक सूचना केल्या आहेत. नांदेड ज
मराठवाड्यातील


छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगर नांदेड लातूर परभणी हिंगोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घेतली असून तातडीने प्रशासनाला अनेक सूचना केल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती नुसार छत्रपती संभाजीनगर येथून सैन्याची एक तुकडी सुद्धा रवाना केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. काल येथे झालेला पाऊस सुमारे 206 मि.मी. इतका होता. त्यामुळे रावनगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ येथील जनजीवन प्रभावित झाले आहे.रावनगाव येथे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून, त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

हसनाळ येथे 8 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. भासवाडी येथे 20 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. भिंगेली येथे 40 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. 5 नागरिक बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. मी स्वत: नांदेड जिल्हाधिकार्‍यांशी सातत्याने संपर्कात असून, नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करीत आहेत. एनडीआरएफची 1 चमू, एक लष्करी पथक आणि पोलिसांची चमू समन्वयातून बचाव कार्य करीत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून सैन्याची एक तुकडी सुद्धा रवाना झाली आहे. स्थानिक प्रशासनाला सातत्याने प्रभावित भागात राहून समन्वय साधण्यास सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande