अमरावती, 18 ऑगस्ट (हिं.स.)
कारागृहातील बंदीजवळ अर्धा किलो कोकीन ड्रग्ज सापडल्याने कारागृहात चांगलीच खळबळ उडली. जेल प्रशासनाने फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दिली. त्याधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून बंदीला अटक करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. विशाल गौतम फ्राड (३१ रा. भांडूप, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या बंदीचे नाव आहे. संबंधित बंदी पॅरोल रजेवरून कारागृहात नुकताच आला होता, अशी माहिती आहे.
बंदी गौतम पराड हा हत्येच्या गुन्ह्यात अमरावती कारागृहात गेल्या काही महिन्यापासून जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. कारागृहात त्याचे वर्तण व वागणूक चांगली असल्यामुळे जेल प्रशासनाने त्याची दोन महिन्याची पॅरोल सुट्टी मंजुर केली होती. ११ जुन २०२५ रोजी तो अमरावती कारागृहातून पॅरोल रजेवर गेला होता. दोन महिने मुंबईत परिवारासह राहिल्यानंतर तो १४ ऑगस्टला सायंकाळी अमरावती कारागृहात परत आला. नियमानुसार कारागृहात प्रवेश केल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ अर्धा किलो कोकीन ड्रग्ज आढळले. संबंधित कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. माहिती मिळताच अधिकारी पोहचले आणि बंदीची त्यांनी कसून चौकशी केली. परंतु त्याने काही सांगितले नाही. त्यामुळे कारागृह प्रशासनाने फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दिली. या घटनेत फ्रेजरपुरा पोलिसांनी जेल कर्मचारी अनिल गजानन हरणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून कोकीन जप्त केले. तसेच संबंधित बंदीला अटक करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
कोकीन जप्त केले
संबंधित बंदी पॅरोल रजेवरून कारागृहात आला तेव्हा नियमानुसार त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ अर्धा किलो कोकीन आढळले. जेल कर्मचाऱ्याने तक्रार दिली. त्याआधारावर गुन्हा दाखल करुन कोकीन जप्त केली. तसेच संबंधित बंदीला अटक करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
- रोशन शिरसाट, फ्रेजरपुरा ठाणेदार.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी