भारतीय वंशाची कृष्णांगी मेश्राम बनली ब्रिटनची सर्वात तरुण वकील
लंडन, 18 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय मूळची लॉ ग्रॅज्युएट कृशांगी मेश्राम अलीकडच्या वर्षांमध्ये इंग्लंड आणि वेल्समध्ये सर्वात कमी वयाची सॉलिसिटर ठरली आहे. त्यांनी केवळ २१ वर्षांच्या वयात हे यश मिळवले आहे. सॉलिसिटर म्हणजे असा वकील जो कायद्याच्या विविध क्षेत
कृष्णांगी मेश्राम


लंडन, 18 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय मूळची लॉ ग्रॅज्युएट कृशांगी मेश्राम अलीकडच्या वर्षांमध्ये इंग्लंड आणि वेल्समध्ये सर्वात कमी वयाची सॉलिसिटर ठरली आहे. त्यांनी केवळ २१ वर्षांच्या वयात हे यश मिळवले आहे. सॉलिसिटर म्हणजे असा वकील जो कायद्याच्या विविध क्षेत्रांमध्ये तज्ज्ञ सल्ला देतो आणि आपल्या क्लायंटच्या कायदेशीर हिताचे प्रतिनिधित्व आणि संरक्षण करतो.

कृशांगी मेश्राम यांनी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या युनिव्हर्सिटीला दिले आहे. त्यांनी म्हटले, “मी अत्यंत आभारी आहे की ओपन युनिव्हर्सिटीने मला १५ वर्षांच्या वयात एलएलबीसाठी शिक्षण सुरू करण्याची संधी दिली. शिक्षणाच्या काळातच मी केवळ माझ्या कायदेशीर करिअरसाठी शैक्षणिक पाया तयार केला नाही, तर कायद्याविषयी खोल आणि टिकणारे आकर्षणही निर्माण झाले.”

या आठवड्याच्या सुरुवातीला ओपन युनिव्हर्सिटीने “लॉ ग्रॅज्युएट कृशांगीने पुन्हा एकदा इतिहास रचला” या शीर्षकाखाली एक विशेष लेख प्रसिद्ध केला, ज्यात त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले आहे.

पश्चिम बंगालमध्ये वाढलेल्या कृशांगी मेश्राम सध्या संयुक्त अरब अमिरातमध्ये राहत आहेत. मेश्राम यांनी केवळ १५ व्या वर्षी इंग्लंडमधील मिल्टन कीन्स येथील ओपन युनिव्हर्सिटीमध्ये कायद्याचे (लॉ) शिक्षण सुरू केले होते. केवळ १८ वर्षांच्या वयात त्यांनी लॉमध्ये फर्स्ट क्लास ऑनर्ससह पदवी मिळवली. त्या आजवरच्या सर्वात कमी वयाच्या ओयू लॉ ग्रॅज्युएट ठरल्या. सध्या त्या यूके आणि यूएईमध्ये कायदेशीर संधी शोधत आहेत.

२०२२ मध्ये त्यांनी एका आंतरराष्ट्रीय कायदेशीर फर्ममध्ये नोकरी सुरू केली.त्यांनी हार्वर्ड ऑनलाइनमधील जागतिक कार्यक्रमांमध्येही भाग घेतला आहे आणि सिंगापूरमध्ये काम करून व्यावसायिक अनुभव मिळवला आहे.त्यांच्या कायदेशीर आवडीच्या क्षेत्रांमध्ये फिनटेक, ब्लॉकचेन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि प्रायव्हेट कस्टमर सर्व्हिसेस यांचा समावेश आहे.त्या बिझनेस आणि प्रायव्हेट क्लायंट्ससाठी कायदेशीर सेवांमध्ये तज्ज्ञता मिळवू इच्छितात. त्यांचा दीर्घकालीन हेतू म्हणजे उदयोन्मुख डिजिटल तंत्रज्ञान आणि ग्राहक-केंद्रित कायदेशीर सेवा यांवर लक्ष केंद्रित करून यूके किंवा यूएईमधील मोठ्या कायदेशीर फर्म्समध्ये काम करणे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande