अमेरिका दररोज भारत-पाकिस्तानमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून - परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ
वॉशिंग्टन, 18 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिका दररोज भारत-पाकिस्तानमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे विधान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी रविवारी(दि.१७) एका मुखातील बोलताना केले आहे. त्यांनी पुन्हा एकदा या दोन आशियाई शेजाऱ्यांमधील अणु तणाव क
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री


वॉशिंग्टन, 18 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिका दररोज भारत-पाकिस्तानमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे विधान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी रविवारी(दि.१७) एका मुखातील बोलताना केले आहे. त्यांनी पुन्हा एकदा या दोन आशियाई शेजाऱ्यांमधील अणु तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यांची पुनरावृत्ती केली आहे. पुढे ते म्हणाले की, युद्धविराम केव्हाही सहजपणे तुटू शकतो, त्यामुळेच अमेरिकेचा भर कायमस्वरूपी समाधानावर आहे. दरम्यान, भारताने वारंवार या अमेरिकी दाव्याला फेटाळून लावले आहे. भारताचे म्हणणे आहे की, शस्त्रसंधीबाबत चर्चा केवळ पाकिस्तानसोबतच झाली होती आणि ती मागणी इस्लामाबादकडूनच करण्यात आली होती. पाकिस्ताननेही ट्रम्प यांच्या दाव्याचे समर्थन केले आहे.

मार्को रूबियो म्हणाले, युद्धविरामाच्या बाबतीत सर्वात कठीण गोष्ट म्हणजे तो टिकवून ठेवणं. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, आम्ही भारत-पाकिस्तान तसच कंबोडिया-थायलंडमध्ये दररोज काय सुरु आहे, त्यावर लक्ष ठेऊन आहोत” पुढे ते म्हणाले की, “युद्धविराम तुटू शकतो. आम्ही स्थायी युद्धविरामासाठी प्रयत्न करतोय, यावर कोणीही असहमत होणार नाही. एक शांती करार आमचं लक्ष्य आहे. त्यामुळे आताही युद्ध होणार नाही आणि भविष्यातही होणार नाही”

रुबिओ यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील अलीकडील संघर्षाचा उल्लेख केला, ज्याला राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा थांबवल्याचा दावा केला आहे. रुबिओ म्हणाले, “मला वाटते की आपण खूप भाग्यवान आणि धन्य आहोत. आपल्याकडे अशा राष्ट्रपती आहेत याबद्दल आपल्याला कृतज्ञ असले पाहिजे, ज्यांनी शांतता आणि सलोखा साध्य करणे ही त्यांच्या प्रशासनाची प्राथमिकता बनवली. आपण हे कंबोडिया आणि थायलंडमध्ये पाहिले. आपण हे भारत-पाकिस्तानमध्ये पाहिले. आपण हे रवांडा आणि डीआरसी (काँगो) मध्ये पाहिले. आणि आम्ही जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे काही संधी मिळू शकतील, त्याचा पाठपुरावा करत राहू.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande