मर्सिजीस-ट्रकचे उदाहरणासह केले होते बावळट विधान
इस्लामाबाद, 18 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर अलीकडेच अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात फ्लोरिडामध्ये पाकिस्तानी समुदायाला संबोधित करताना त्यांनी भारत-पाकिस्तान तणावावर बोलताना भारत ही मर्सिडीज आहे, तर पाकिस्तान हा खडीने भरलेला डंप ट्रक आहे अशी मुर्खासारखी तुलना केली होती. यावर आता पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी सार्वजनिक व्यासपीठावर त्याची पुष्टी केली.
मोहसिन नकवी यांनी सांगितले की, भारतासोबत तणावाच्या काळात सौदी अरेबिया मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा सौदी प्रतिनिधीमंडळ पाकिस्तानात आले, तेव्हा असीम मुनीर यांनी म्हटले की भारत मर्सिडीज आहे आणि पाकिस्तान खडीने भरलेला ट्रक आहे. आता तुम्हीच समजून घ्या, धडकेत जास्त नुकसान कुणाचे होईल. नकवी यांनी या वक्तव्याला मुनीर यांची रणनीती आणि पाकिस्तानची ताकद म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला, पण पाकिस्तानात याचा उलट परिणाम झाला. सोशल मिडियावर अनेक युजर्सनी टोले लगावले की, स्वतःला ट्रक म्हणत मुनीर आणि नकवी यांनी मान्य केले की पाकिस्तानची अवस्था किती खराब आहे. पाकिस्तानातील अनेक लोकांनी याकडे आत्मग्लानी आणि अपयशाच्या प्रतीक म्हणून पाहिले आहे.
ही वक्तव्ये अशा वेळी आली आहेत जेव्हा एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ७ ते १० मे दरम्यान चाललेल्या या ऑपरेशनमध्ये भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर लक्ष्य साधले. पाकिस्तान सरकार आणि लष्कर वारंवार हा दावा करत आहेत की त्यांना फारसा नुकसान झाला नाही, पण पाकिस्तानच्या नेत्यांची आणि लष्करी अधिकाऱ्यांची वक्तव्ये अनेकदा त्यांच्या कमजोरीच उघड करत आहेत.मुनीर आणि नकवी यांची ही वक्तव्ये पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवरही परिणाम करत आहेत. एकीकडे ते विजयाचे दावे करत आहेत, तर दुसरीकडे स्वतःला “ट्रक” आणि भारताला “लक्झरी कार” म्हणत अप्रत्यक्षपणे मान्य करत आहेत की भारत तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या त्यांच्या कितीतरी पुढे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode