ईशान किशन दुलीप ट्रॉफीतून बाहेर; पूर्व विभागाचे नेतृत्व ईश्वरनकडे
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट (हिं.स.) : पूर्व विभागाचा कर्णधार ईशान किशन दुलीप ट्रॉफी २०२५ मधून बाहेर पडला आहे. २७ वर्षीय विकेटकीपर-फलंदाजाकडे पूर्व विभागाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती . आता तो २८ ऑगस्टपासून बंगळुरू येथे सुरू होणाऱ्या सहा संघांच
ईशान किशन


नवी दिल्ली, 18 ऑगस्ट (हिं.स.) : पूर्व विभागाचा कर्णधार ईशान किशन दुलीप ट्रॉफी २०२५ मधून बाहेर पडला आहे. २७ वर्षीय विकेटकीपर-फलंदाजाकडे पूर्व विभागाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती . आता तो २८ ऑगस्टपासून बंगळुरू येथे सुरू होणाऱ्या सहा संघांच्या स्पर्धेत खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत, २० वर्षीय ओडिशाचा विकेटकीपर आशिर्वाद स्वेनला ईशानच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आले आहे. ओडिशा क्रिकेट असोसिएशनने ही माहिती दिली. ओडिशा क्रिकेट असोसिएशनने सोशली मीडियीवरील एक्सवर लिहिले की, ओडिशाचा विकेटकीपर-फलंदाज आशिर्वाद स्वेनची दुलीप ट्रॉफीसाठी पूर्व विभागाच्या संघात निवड झाली आहे. तो इशान किशनची जागा घेईल. तो संदीप पटनायकसह संघात सामील होईल. तर स्वस्तिक सामलला स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले आहे. आशिव स्वेनने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ११ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या दरम्यान, त्याने २१ डावांमध्ये ३०.७५ च्या सरासरीने ६१५ धावा केल्या आहेत. त्याला आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. पण त्याच्या बॅटवरून 3 अर्धशतके निघाली आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 77 धावा आहे. ईशानने 14 मार्च 2021 रोजी अहमदाबाद येथे इंग्लंडविरुद्ध पदार्पण केल्यापासून भारतासाठी दोन कसोटी, 27 एकदिवसीय आणि 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तो शेवटचा नॉटिंगहॅमशायरकडून 29 जून ते 2 जुलै दरम्यान टॉंटनमध्ये सोमरसेटविरुद्ध खेळताना दिसला होता. त्या सामन्यात त्याने क्रमांक 6 चा फलंदाज म्हणून 77 धावा केल्या. ईशान किशनच्या अनुपस्थितीत बंगालचा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन पूर्व विभागीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. बंगालचा उजव्या हाताचा फलंदाज ईश्वरनने आतापर्यंत खेळलेल्या 103 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 7841 धावा केल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande